महान्यूज नोकरी शोधा ?
संधी रोजगाराची खात्री नोकरीची मंगळवार, १४ मे, २०१३
उज्ज्वल भवितव्यासाठी भरारी घेताना पंखांत बळ हवे प्रयत्नांचे. या प्रयत्नांना दिशा मिळेल आता एका क्लिकवर. आतापर्यंत साडेपाच लाखाहून अधिक संधींची माहिती देणार्‍या महाऑपमध्ये आज पहा हजाराहून अधिक संधी!

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात 438 जागा

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत राज्यातील दहा जिल्ह्यात जिल्हास्तरावर जिल्हा अभियान व्यवस्थापक (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक-उपजीविका/कृषी (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक-उपजीविका/ बिगर कृषी (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक- क्षमता बांधणी (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक- सामाजिक समावेशन व संस्थीय बांधणी (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक - संनियंत्रण व मुल्यांकन (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक- माहिती व्यवस्थापन प्रणाली (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक- आर्थिक समावेशन (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक-ज्ञान व्यवस्थापन (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक- विपणन (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक-रोजगार व कौशल्य विकास (10 जागा), कार्यालय अधीक्षक तथा जिल्हा व्यवस्थापक- संपादणूक (10 जागा) तसेच तालुका स्तरावर तालुका अभियान व्यवस्थापक (30 जागा), तालुका व्यवस्थापक - उपजीविका (30 जागा), तालुका व्यवस्थापक - क्षमता बांधणी (30 जागा), तालुका व्यवस्थापक - सामाजिक समावेशन व संस्थीय बांधणी (30 जागा), तालुका व्यवस्थापक - माहिती व्यवस्थापन प्रणाली व संनियंत्रण व मुल्यांकन (30 जागा), तालुका व्यवस्थापक - आर्थिक समावेशन (30 जागा) आणि क्लस्टर कोऑर्डिनेटर (138 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2013 आहे. अधिक माहिती http://www.jobs.msrlm.org/job https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये 19 जागा

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये नियोजक (2 जागा), उपनियोजक (8 जागा), सहायक पणन व्यवस्थापक (1 जागा), उपलेखापाल (8 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 14 मे 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

बार्टी संस्थेमार्फत दक्षिण मुंबई कार्यालयात लिपिक टंकलेखक/संगणक ऑपरेटरच्या 11 जागा

पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) या संस्थेमार्फत दक्षिण मुंबई येथील कार्यालयात लिपिक टंकलेखक/संगणक ऑपरेटर (11 जागा) हे पद तात्पुरत्या करार तत्वावर भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखत दि. 21 मे 2013 रोजी होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 14 मे 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

जिल्हा निवड समितीमार्फत अहमदनगर जिल्हा परिषदेतील 284 जागांसाठी भरती

जिल्हा निवड समितीमार्फत अहमदनगर जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहाय्यक लिपिक (7 जागा), कनिष्ठ सहाय्यक- लिपिक (10 जागा), लघु नि टंकलेखक (1 जागा), कनिष्ठ सहाय्यक-लेखा (7 जागा), औषध निर्माता (11 जागा), आरोग्य सेवक पुरुष - हंगामीमधून (23 जागा), आरोग्य सेवक पुरुष (5 जागा), आरोग्य सेवक-महिला (38 जागा), विस्तार अधिकारी- पंचायत आणि समाजकल्याण (4 जागा), विस्तार अधिकारी-सांख्यिकी (2 जागा), कंत्राटी ग्रामसेवक (60 जागा), कृषि अधिकारी (4 जागा), विस्तार अधिकारी - कृषी (7 जागा), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (6 जागा), कनिष्ठ आरेखक (1 जागा), पर्यवेक्षिका (6 जागा), विस्तार अधिकारी - शिक्षण (6 जागा), परिचर (91 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 मे 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. नवाकाळमध्ये 8 मे 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती https://oasis.mkcl.org/zp२०१३ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


पुणे विद्यापीठात सरळसेवेद्वारे शिक्षकेतर सेवकांच्या 63 जागा

पुणे विद्यापीठात सरळसेवेद्वारे शिक्षकेतर सेवकांची उप वित्त व लेखा अधिकारी (1 जागा), उपकुलसचिव (7 जागा), अंतर्गत हिशोब तपासणीस (1 जागा), जनसंपर्क अधिकारी (1 जागा), सहायक कुलसचिव (14 जागा), सहायक वित्त अधिकारी (1 जागा), प्रोग्रॅमर (8 जागा), आरोग्य अधिकारी (1 जागा), उप अभियंता -विद्युत (1 जागा), कर्मशाळा अधिक्षक (1 जागा), सहायक अभियंता-विद्युत (1 जागा), कक्षाधिकारी -सर्वसाधारण (20 जागा), कक्षाधिकारी-लेखा (6 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2013 आहे. अधिक माहिती http://www.unipune.ac.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


कोकण रेल्वे कार्पोरेशनमध्ये २ जागा

कोकण रेल्वे कार्पोरेशनमध्ये उप मुख्य पर्सनल अधिकारी (१ जागा), मुख्य जनसंपर्क अधिकारी (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 मे 2013 आहे. यासंबंधीचा अधिक माहिती http://www.konkanrailway.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


पुण्यातील
भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत 17 जागा

पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत अधिष्ठाता- चित्रपट (1 जागा), प्रोफेसर (एकूण 3 जागा), सहयोगी प्राध्यापक (4 जागा), सहायक प्राध्यापक (8 जागा), चित्रपट संशोधन अधिकारी (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 23-29 मार्च 2013 च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.ftiindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


‘महाऑप’ या सदरात देण्यात येणारी रिक्त पदांची माहिती संबंधित विभागाने वृत्तपत्रात अथवा त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्याप्रमाणे असते. उमेदवारांच्या सोयीसाठी ‘महान्यूज’ मध्ये ती संकलित केली आहे. सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात पाहावी.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा